• Tue. Aug 16th, 2022

  जळगाव शहरला आता तिसऱ्या लाटेचा धोका ; कोरोनाचे पुन्हा नवीन तीन रुग्ण.

  ByKhandeshTimes

  Sep 13, 2021

  गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून , सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाचवर गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या बारा दिवसांतच पंधरा झाली .सक्रिय रुग्णसंख्या १२ दिवसांत तिप्पट झाल्याने जळगाव शहरात भितीचे वातावरण पसरले आहे जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हाहाकार माजला होता . मात्र ही लाट लवकर आटोक्यात आली . या वेळी ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तवण्यात आली होती . मात्र जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात राहिल्याने दिलासा मिळाला होता पण रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाल्याने तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे . त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे झाले आहे .त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर कारणे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.