जाणून घ्या : गणपतीची पूजा करण्याची शुभ वेळ आणि प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य.

* गणपतीची पूजा करण्याची शुभ वेळ :

आज गणपती पूजेचा शुभ वेळ अभिजीत मुहूर्तामध्ये १२.१७ वाजता सुरु होईल आणि पूजेसाठी शुभ वेळ रात्री १० वाजेपर्यंत असेल . पूजेच्या वेळी , ” ओम गं गणपतये नम : ” या मंत्राचा जप करताना गणेशाला पाणी , फुले , अक्षदा , चंदन आणि धूप – दीप तसेच फळ नैवेद्य अर्पण करा . गणेशाला त्यांचे सर्वात प्रिय मोदक प्रसाद म्हणून अर्पण करा आणि आज गणेश उत्सवाचा आनंदाने लाभ घ्या .

* गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य :

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर . पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळे , विड्याची पाने , सुपाऱ्या , पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्री , ताम्हण , समई , अक्षता , वस्त्र , जानवे , अष्टगंध , पत्री , शेंदूर , सुपाऱ्या , नारळ , फळे , प्रसादाकरिता मोदक , मिठाई , पेढे.

Leave a Reply

Your email address will not be published.