जानेवारीला बसणार सामान्य माणसाच्या खिशाला फटका वस्तूंच्या किमती पोहोचणार गगनाला , वस्तूंची यादी जाणून घ्या

शेअर करा.

जानेवारी २०२२ च्या सुरुवातीला काही वस्तू महाग होणार असल्याची बातमी कळाली आहे , सामान्य नागरिकांचे बजेट यामुळे कोलमडणार असल्याचे दिसत आहे . केंद्र सरकारनं २०२२ पासून गारमेंट्स , कपडे व चप्पल या प्रकारच्या गोष्टींच्या उत्पादनावरील GST ५ टक्क्यापेक्षा अधिक १२ टक्के करण्याचा म्हणजे दोन पट्टीने वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे , या कारणामुळे नवीन वर्षात सामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे .

 

गारमेंट्स , कपडे आणि चप्पल यासारख्या गोष्टींच्या उत्पादनावर GST ५ टक्क्यांहून १२ टक्के वाढविण्याबद्दल केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाने याची चालू घोषणा केल्याचे कळत आहे . सोर्स प्रमाण , जानेवारी २०२२ पासून जीएसटी ही ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के लागू होणार आहे . व जो आधी १ हजार रुपयांच्या किंमतीपर्यंत ५ टक्के होता .

 

वर्ष २०२२ मध्ये टेक्सटाइल्स ( विणलेले कपडे, कंबल ,सिथेंटिक यार्न , पाइल कपडे , टेंट , 9 टेपेस्ट्री यासारखे सामानासोबत चप्पल इतर फुटवेअर या वस्तू महागाईला येणार आहेत . तर कोणत्याही किमती असलेल्या फुटवेअरवर सुद्धा नवे जीएसटी दर लागू केले होणार आहेत . मिळालेल्या माहितीप्रमाणे जीएसटी काउंसिलने ती वाढवण्याची शिफारस केल्याचे दिसत आहे . यादरम्यान क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया ( CMAI ) यांनी कपड्यांवरील जीएसटी दर वाढवण्याच्या या सरकारच्या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली जात असल्याच्या कळाले आहे , या खर्चामध्ये वाढ झाल्याने कापड उद्योगावर प्रचंड असा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . आधी असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ व मालवाहतूक खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे हा उद्योगअडचणीत आल्याचे दिसत आहे .

 

एसोचॅमने अन्न प्रक्रिया उद्योगांना लागू होत असलेल्या जीएसटीचे दर कमी करावी अशी मागणी केली असून या विभागात पॅकेज केलेल्या ब्रँडेड व नॉन – ब्रँडेड खाद्यपदार्थांमध्ये लागू होणारे दर तर्कसंगत दिसून येईल असे देखील सांगण्यात आले आहे . सध्या , बटाटा चिप्स , तृणधान्ये , स्नॅक फूड्स , नमकीन याप्रकारेचे ब्रँडेड व पॅकेज केलेले खाद्यपदार्थ १२ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये सामाविष्ट असतात , तर नॉन – ब्रँडेड नमकीन , चिप्स आणि भुजिया यांच्यावर पाच टक्के इतका कर आकारला जात असतो .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply