जामनेर तालुक्यात पावसाचा प्रचंड हाहाकार .. शेतकऱ्याला आले रडू म्हणाला देवा आम्हाला हळूहळू मारण्यापेक्षा एकदाचं मारून टाक , अनेक झाडे नष्ट , बागांचे नुकसान.

जामनेर तालुक्यात आज पावसाने प्रचंड असा हाहाकार माजवला त्यामुळे गावातील अनेक झाडे मुळासकट नष्ट होऊन खाली पडली , गावातील अनेक बागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश रडू कोसळले . पावसाचे प्रमाण वाढल्या कारणामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली .तसेच

गावातील अनेक घरांच्या भिंतीचे नुकसान होऊन काही तर खाली पडून नष्ट झाल्या . हया घटनांमुळे तालुक्यांतील नागरीक हवालदित झाले आहे अलीकडे चाळीसगांव तालुक्यांत आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले त्यापाठोपाठ आता जामनेर तालुक्यांत ही अनेक घरांचे नुकसान झाले आहे . हवामाशास्त्रच्या अंदाजानुसार येते २४ तास जळगाव , धुळे , नंदुबार या जिल्ह्यात अजुन मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.