जैतपिर जि.प. केंद्र प्राथ शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड संपन्न….

शेअर करा.

अमळनेर ÷ तालुक्यातील जैतपिर येथील जि.प.केंद्र प्राथ शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. या प्रसंगी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखाबाई रविंद्र देशमुख ह्या उपस्थित होत्या.

गावतील बहुसंख्य पालकाच्या विचार विनिमयातुन व उच्चशिक्षित तथा शिक्षण विभागाची तंतोतंत माहिती असणारे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी *श्री. मुकेश राजपुत* यांची तर उपाध्यक्षपदी श्री. शिवाजी बेलदार सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शिक्षणतज्ज्ञ अभिमन हरसिंग पा. सदस्यपदी जगन कोळी, रेखा सुरेश धनगर, संगीता बापू चौधरी, अर्चना सुरेश भिल, पूनम चिंधा कुंभार यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुरेखाबाई रविंद्र देशमुख, उपसरपंच बेबाबाई रमेश पा. मा. सरपंच निलेश शिवाजी बागुल ग्रा.प.सदस्य संजय शिवराम चौधरी, संजय उत्तम पा,विलास युवराज पा. कोमल सुकलाल पा. प्रमिलाबाई भगवान मोरे, बबाबाई आधार धनगर, ज्योती संजय कोळी, व गावातील शिक्षक प्रेमी नागरिक राजाराम धनगर, धनराज बागुल, दशरथ कोळी, सुरेश भिल, बापू नाईक इ. नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्ताविक मुख्याध्यापक कणिराम जाधव यांनी तर सुत्रसंचालन प्रदीपसिंग पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रविंद्र बोरसे, संजय शिसोदे, विजय पवार, कविता पाटील यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply