ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज दुःखद निधन (Lata Mangeshkar)

शेअर करा.

मुंबई : भारताच्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळी दिनांक ६ रोजी दुःखद निधन झालं आहे . वयाच्या ९ ३ व्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला . लता दीदी यांची प्रकृती ही काल पुन्हा ढासळली होती , त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती . मागील 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते . त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे , असं डॉक्टरांनी सांगितलं होतं . परंतु आज सकाळी ८:१२ मिनिटांनी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला .या दुःखद अशा घटनेवर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येतं आहे .

लता मंगेशकर यांना थोड्या दिवसांआधी कोरोनाची लागण झाली . त्याचबरोबर त्यांना न्यूमोनिया देखील झालाय . त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले होते. लता मंगेशकर यांचं वय 93 वर्ष होतं . त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात आलेली होती

सर्वात आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दुःखद बातमी दिली होती . संजय राऊत यांनी ट्विट करून असे म्हटले होते की, लता मंगेशकर अमर आहेत …. युग संपलं असं म्हटलं होतं .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply