• Tue. Aug 16th, 2022

  टेनिस :Ash barty दीड तासात झाली विजयी,दोन वर्षांनंतर वापसी करणारी सर्वक्षेष्ट मानांकित.

  २०१९ नंतर पहिल्या UAS ओपनमध्ये खेळत असलेल्या जगातील पहिल्या महिला टेनिसपटू अश्ले बार्टीने द्वितीय फेरीत प्रवेश केला आहे . सर्वक्षेष्ट मानांकित ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने प्रथम फेरीत रशियाच्या वेरा ज्योनारोवाला ६-१ , ७-६ ने मात दिली . २५ वर्षीच्या बार्टीनाने आर्थर अॅश स्टेडियमवर सुमारे १ तास २८ मिनिटांत विजय प्राप्त केला . बार्टीने नेटवर जबरदस खेळ केला . तिने ११ ऐस व ३१ विनर्स मारले . बार्टीने यावर्षीत ५ किताब पटकावले , ज्यात विम्बल्डन व सिनसिनाटी मास्टर्सचा समावेश आहे . द्वितीय फेरीत बार्टीचा सामना डेन्मार्कच्या १८ वर्षीय खेळाडू क्लारा टॉसनशी होईल . टॉसनची क्रमवारी ७८ आहे .

   

  माजी चॅम्पियन बियांका आंद्रेस्कूने ३ सेटमध्ये गोलुबिचला हरवले

  महिला एकेरीमध्ये २०१ ९ च्या चॅम्पियन कॅनडाची बियांका आंद्रेस्कूने स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलुबिचला ७-५ , ४-६ , ७-५ ने पराभूत केले . ६ व्या मानांकित आंद्रेस्कू आता अमेरिकेच्या लॉरेन्स डेव्हिसशी सामना करेल . माजी १-नंबर -कॅरोलिना प्लिसकोवाने मोंटेनेग्रोच्या डेंका कोविनिचला ६-४ , ६-३ आणि १० व्या मानांकित पेत्रा क्वितोवाने पोलोना हरकोगला ६-१ , ६-२ ने पराभवास नेले .

   

  जगातील नंबर -१ योकोविकची १८ वर्षीय होल्गरवर २ तास १५ मि.मात नंबर -१ व सर्वक्षेष्ट मानांकित नोवाक योकोविकने डेन्मार्कच्या १८ वर्षीच्या पात्रता पटकवलेला होल्गर रुनला६-१ , ६-७ , ६-२,६-१ने पराभूत केले . रुनची ही पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा होती . ३४ वर्षीय योकोविकने रुनला २ तास १५ मिनिटांत नमावले .

  Leave a Reply

  Your email address will not be published.