ट्रायल च्या बहाण्याने केली गाडी फुरर !

नंदुरबार : वाहनाची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीचे फोर व्हीलर वाहन चोरी केल्याची घटना हि शहरातील जगताप वाडी या परिसरातील महादेव नगरात घडून आली . याच प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करून वाहनासोबत पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे . मनोहर सतिलाल बागूल यांचा वाहन भाड्याने नेण्याचा हा व्यवसाय आहे . १८ रोजी मनोहर यांच्याकडे दोघे अनोळखी आले होते . आपण एका फायनान्स कंपनीतून आलो असून दीपक व सतीश याप्रकारे दोघांनी त्यांची नावे सांगितली .

दोघांनी मनोहर बागूल यांच्या वाहनाची तपासणी करून वाहन भाडोत्री पद्धतीने पाहिजे असे सांगितले . पण आत्ता वाहनाची ट्रायल घेण्याची बहाणेबाजी त्यांनी केला . दोघांनी १० मिनिटात येतो असे सांगून गाडी घेऊन गेल्यानंतर , ते पुन्हा परतलेच नाहीत . दोघांची ओळख न पटल्याने अखेर त्यांनी पोलीस चौकीच्या दिशेने धाव घेतली . या संपूर्ण घटनेशी निगडीत मनोहर बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक व सतीश नामक दोघ संशयितां विरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या केसची तपासणी उपनिरीक्षक मुकेश पवार करत असल्याचे कळाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.