डिप्लोमासाठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक झाले जाहीर , होतील दोन फेऱ्या , अभ्यासक्रमाला होईल सुरुवात.

दहावीच्या निकालानंतर दीड महिन्यापासून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू होती .यास प्रक्रियेस सातत्याने मुदतवाढ दिली जात अखेर शुक्रवारी हे वेळापत्रक विभागाने जाहीर केले आहे. सप्टेंबरपासून कागदपत्रे अपलोड करणे , पडताळणी , अर्ज निश्चिती करता येणार आहे . अर्ज छाननी स्कूटनी करून ऑनलाइन नोंदणी करणे व कागदपत्रांची पडताळणी ७ सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे . ९ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल . १२ सप्टेंबरपर्यंत तक्रार याद्यांमध्ये हरकती सादर करता येतील . अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे . केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया ( कॅप पहिली फेरी १३ सप्टेंबरला जाहीर होईल . विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम संस्थांची निवड १८ सप्टेंबरपर्यंत करता येईल . वाटप केलेल्या जागेची स्वीकृती करणे , पडताळणी करणे , शुल्क भरणे यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे . सप्टेंबरला दुसऱ्या फेरीच्या जागा प्रदर्शित होतील ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व निश्चितीसाठी २८ सप्टेंबर मुदत असेल . जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेशासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे . सर्व संस्थांसाठी शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होईल .

Leave a Reply

Your email address will not be published.