डेंग्यू संदर्भात निष्काळजी केल्यास होईल गुन्हा दाखल.

धुळे :शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत . डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून युध्दपातळीवर प्रयन केले जात आहे . मात्र त्यानंतरही रुग्णांची संख्या कमी होत नाही . त्यामुळे नागरिकांसह लोक प्रतिनिधीकडून प्रशासनावर खापर कोडले जात आहे काही नागरिक उघड्यावर पाणी साठवणे , छतावर भंगार साहित्य ठेवणे , टायर ठेवतात त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पन्ती होते . ही बाब आरोग्य विभागाने घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून स्पट झाली आहे त्यामुळे अशा बेजाबदार व्यक्तीना नोटीस बजवा असे सांगण्यात आले तरीही सुधारणा होत नसेल तर अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे . शहरातील डेंग्यू व मलेरिया तसेच चिकनगुनिया या आजारासंदभात शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली . यात त्यांनी शहरातील डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला तसेच यावर उपाय योजनावर चर्चा करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published.