डॉक्टर खून प्रकरणात तीन संशयित टॅटूमुळे सापडले ; कोठडीत केली रवानगी.

चिमठाणे शिवारात रस्तालुटीतून शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील प्रेमसिंग गिरासे या गुरांच्या डॉक्टरचा काल सोमवारी खून झाला होता याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने ३ मुख्य संशयितांना अटक केली आहे.

मुख्य संशयितच्या हातावर टॅटू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी काही तासांत तिघांना गजाआड केले .परिसरातील पेट्रोल पंप व हॉटेलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले . फुटेजमध्ये मृत गिरासे यांच्या मागे दोन तरुण दिसले त्यापैकी एकाच्या हातावर विशिष्ट टॅटू होता . त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला . फुटेजवरून तरुणाचे चित्र घेण्यात आले . ते नागरिकांना दाखवले . त्यानंतर खलाणे गावातील श्याम युवराज मोरे याचे नाव समोर आले . पोलिसांनी खलाणे गावात जाऊन चौकशी केली . या वेळी श्याम मोरे माळीच गावात सासरवाडीला असल्याची माहिती मिळाली . त्यामुळे माळीच गावात जाऊन पोलिसांनी चौकशी केली , तेथे श्याम व त्याचा सहकारी राकेश रोहिदास मोरे हे शिरपूरला जात असल्याची माहिती मिळाली .

पोलिसांनी सापळा रचून गाव शिवारात श्याम व राकेशला अटक केली . ते पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढत होते . दोघांकडे चौकशी केल्यानंतर संदीप फुलचंद पवार याचेही नाव समोर आले . त्यालाही अटक करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published.