डॉक्टर राजन शिंदे यांचा झाला खून तोदेखील अल्पवयीन मुलाच्या हाती ,काय घडला प्रकार वाचा संपूर्ण बातमी.

शेअर करा.

औरंगाबाद : राज्यभर गजबजलेले प्रा : डॉ . राजन शिंदे यांच्या खुनाचे रहस्य तब्बल आठ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी समोर आले आहे . डॉ . शिंदे हे झोपेत असताना अल्पवयीन मुलाने ( विधिसंघर्षग्रस्त बालक ) डंबेल्स च्या साह्याने वार करून त्यांना बेशुद्ध केले .यानंतर चाकूच्या साह्याने गळा , दोन्ही हाताच्या नसा , कान कापून टाकल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे .

 

औरंगाबादेतील मौलाना आझाद या महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख असलेले डॉ . राजन हरिभाऊ शिंदे ( ५१ ) यांचा राहत्या घरी मागील सोमवारी निर्घृण खून झाल्याने मोठी खळबळ उडाली . या खुनाचे रहस्य समोर आणण्यासाठी औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले . खुनाच्या तपासाची माहिती ही माध्यमांना देताना पोलीस अधिकारी सांगतात की , अल्पवयीन मुलगा आणि मयत डॉ . शिंदे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसून आलेले होते . करिअर निवडण्यातून त्यांच्या या वादातून भांडणे टोकाला गेले होते . घटनेच्या दिवशी झोपण्याआधी मुलगा व डॉ . शिंदे यांच्यामध्ये वाद झाला होता . डॉ . शिंदे रागावल्याच्या कारणातून ते झोपेत असतानाच्या वेळी त्यांच्या मानेच्या वरील भागात डंबेल्सने अल्पवयीन मुलाने जोरदार असा वार केले . त्यानंतर चाकूने गळा हाताच्या नसा कापून त्यांची हत्या केल्याचे कळाले आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply