डोळ्याला लागल्या धारा कांद्यामुळे वाचा संपूर्ण बातमी.

शेअर करा.

किनगाव ता.यावलः यावल तालुक्यातील पश्चिम भागात मधल्यामध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे कांदा उत्पादक करणारे शेतकरी मंडळी अडचणीत आली आहे . तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोली , किनगाव , आडगाव , कासारखेडा या परिसरात कांद्याचे प्रचंड प्रमाणात उत्पन्न घेतले जाते .

 

परिसरात मागच्या पंधरवड्यापासून अधून – मधून मुसळधार प्रकाराचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच लागवड केलेला कांदा हा मुसळधार पावसामुळे ५० टक्‍क्‍यापर्यंत वाया जात असल्याचे अनेक भागात आढळून येत आहे . चिंचोली , नायगाव भागात बऱ्याच शेतकरी बांधवांनी लागवड केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला आहे . यामुळे त्याच कांद्याच्या पिकात परत मजूर लावून कांद्याचे रोप लावणी केली जात आहे . त्यामुळे कांदा लागवडीकरन शेतकऱ्यांना पुन्हा संकटात दिसून येत आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply