• Tue. Aug 16th, 2022

  ड्रग्जच्या चक्कर मध्ये सापडला शाहरुखचा मुलगा काय झालं नंतर वाचा संपूर्ण माहिती..

  ByKhandeshTimes

  Oct 4, 2021

  मुंबई : मुंबईजवळील अरबी समुद्रामध्ये आलिशान अशा जहाजावर चालू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण या कक्षाने ( एनसीबी ) शनिवारच्या रात्री केलेल्या धडक कारवाईमध्ये बॉलीवूडचा ‘ किंग ‘ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन यासोबत आठ जणांना अटक केली गेली आहे . शाहरुखच्या मुलाला या ड्रग्जच्या प्रकरणी अटक झाल्याचे देशभरात कळताच बॉलीवूडसह खळबळ उडाली दिसते. या प्रकरणातील सर्व आरोपींना रविवारी किल्ला न्यायालयात हजर केले होते . न्यायालयाने आर्यन खानसह व त्यासोबत तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे . व इतर पाच जणांना आज ,

  सोमवारी न्यायालया मध्ये हजर करण्यात येणार असल्याचे कळाले आहे . त्यात दरम्यान, आर्यन खानतर्फे अॅड . सतीश माने शिंदे यांनी कोर्टात त्याची बाजू मांडली . ‘ एनसीबी’ने दोन दिवसांची मागितल्यावर कोठडी हि त्यांनी आर्यनवरील कलमे जामीन पात्रतेची असल्याचा बचाव केला आहे . परंतु , कोर्टाने तो फेटाळून लावला आहे . आर्यनच्या जामिनकरिता सोमवारी अर्ज करण्यात येणार आहे . या पलीकडे गुजरातच्या मुंद्रा अदानी बंदरावर जप्त केलेल्या १५ हजार कोटी रुपयाच्या मूल्याच्या ड्रग्जचा आणि कॉर्डेलियावरील ड्रग्ज पार्टी याचा काही संबंध आहे का , याचा देखील तपास केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.