तरूणाचा चिरला गळा अमळनेर मध्ये भीतीचे वातावरण.

अमळनेर : शहराच्या नगरपालिकेच्या हशमजी प्रेमजी व्यापारी संकुलात एका ३५ वर्षाच्या तरुणाची गळा चिरून करण्यात आली हत्या हि घटना २७ रोजच्या सकाळी घडली . तीन तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला निष्पन्न केला असून , पैशाच्या वादाविवादातून हा खून झाला असे समजते . प्रकाश दत्तू पाटील ( वय ३५ , रा . गांधलीपुरा , अमळनेर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे .

 

या घटनेबावत बातमी कळताच सुट्टीवर असलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशाखाली API राकेशसिंग परदेशी , हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर , नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनेच्या ठिकाण भेट देऊन पंचनामा केला .

 

शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . हा इसम गांधलीपुरा भागातील प्रकाश दत्तू पाटील ( वय ३५ ) असल्याचे कळाले .

 

तसेच, पैशाच्या वादाविवादातून हा खून झाल्याचे कळते . सुमारे तीन तासात पोलिसांनी हा खून कैलास पांडुरंग शिंगाणे याने केल्याचे साफ केले . आरोपी कैलास पळून गेला असून त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published.