• Tue. Aug 16th, 2022

  तापी नदीपात्रात बुडून बालिकेचा मृत्यू ; भावाला वाचवण्यात आले यश

  ByKhandeshTimes

  Sep 13, 2021

  भुसावळ : शहरातील झेडटीएस परिसरातील तापी नदीवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ सायकल घेऊन फिरायला गेलेल्या बहीण – भावापैकी ११ वर्षीय बहिणीचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला तर १२ वर्षीय भावाला वाचविण्यात यश आले आहे . या घटनेने झेडटीसी परिसरात शोककळा पसरली . याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . येथील झेडटीएस परिसरातील रहिवासी मनीषकुमार यांची अनन्या ( वय ११ वर्षे ) व आर्यन ( वय १२ वर्षे ) ही मुले सायकल फिरवत रेल्वे मार्गाने तापी नदीवरील रेल्वे पुलाजवळ पोहोचले होते .

  * किनाऱ्यावरून पाय घसरल्यामुळे अनन्या पडली पाण्यात  :

  सकाळी ९ वाजेच्या समारास नदी पात्रात दीड दिवसाचा गणपती बुडविण्यासाठी काही भाविक नदी पात्रात आले होते.या वेळी हे दोघे बहीण – भाऊ नदी पात्रात उतरले होते . या वेळी किनाऱ्यावरून अनन्या हिचा पाय घसरला असता तिने मदतीसाठी भाऊ आर्यनला हात दिला . त्यानेही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला . मात्र पाणी जास्त असल्यामुळे ते दोघेही पाण्यात गटांगळ्या खात असताना जवळच असलेल्या भाविकांना हे दिसले.

  * शिक्षकाने केला दोघांना वाचविण्याचा प्रयत्न :

  या वेळी श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचे शिक्षक निवृती पाचपांडे यांनी तत्काळ नदी पात्रात उतरत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला , मात्र केवळ आदित्यलाच वाचविण्यात यश आले . मात्र अनन्या आढळून आली नाही .

  * सायंकाळी ५ वाजता आढळून आला तिचा मृतदेह :

  नदीपात्रात शोधाशोध घटना घडताच आपत्ती व्यवस्थापन समिती व तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले . आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने नदी पात्रात अनन्याचा शोध घेतला असता जवळपास सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजता तिचा मृतदेह आढळून आला .

  Leave a Reply

  Your email address will not be published.