तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नटुकाका यांनी घेतला अखेरचा श्वास..

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अश्या ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ ह्या मालिकेतील ‘ नटू काका यांचे पात्र साकारणारे अभिनेते म्हणजे घनश्याम नायक यांचे रविवार ला निधन झाले . ते ७८ वर्षाच्या घरात असून . मागील काही वर्षभरापासून ते कर्करोगाशी लढत होते . ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेचे निर्माते म्हणजे आसित कुमार मोदी यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती कळविली आहे . मोदी यांनी ’35 ) शान्ति ‘ या प्रकार ट्विट करत नट्टू काकांचा फोटो ट्विटरवर शेअर केलेला दिसून आला .

मागील गेल्या काही ५५ वर्षांपासून ते सिनेसृष्टीत कार्य करत होते . परंतु ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेमार्फत त्यांना प्रचंड अशी प्रसिद्धी मिळाली . नायक यांनी सुमारे ३५० पेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे . अनेक बॉलिवूड चित्रपटातही देखील ते झळकले होते . सलमान खानच्या ‘ हम दिल दे चुके सनम ‘ , ‘ तेरे नाम’ अशा चित्रपटातही त्यांनी काम केल्याचे दिसून आले आहे . त्याच बरोबर’ चोरी चोरी ‘ , ‘ खाकी या चित्रपटातही त्यांनी छोटीशी भूमिका निभावली होती . तसेच नसिरुद्दीन शाह यांच्या ‘ मासूम ‘ चित्रपटात ते दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.