• Tue. Aug 16th, 2022

  तिसर्‍या लाटेचा जोरदार तडाखा, केंद्र सरकारची काय असेल रणनीती

  नवी दिल्ली: महाराष्ट्र सोबत आठ राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने वाढत असून तिथे लसीकरण , चाचण्यांचा वेग देखील वाढावा . कडक स्वरूपाचे निर्बंध लादावेत , असे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाठविले आहे .

  महाराष्ट्र , पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांतील स्थिती चिंताजनक स्वरूपाची आहे , असा निष्कर्ष केंद्रीय आरोग्य खात्याने काढलेला दिसत आहे . राजेश भूषण यांनी महाराष्ट्र , दिल्ली , हरयाणा , तामिळनाडू , पश्चिम बंगाल , गुजरात , कर्नाटक , झारखंड या राज्यांना कळविले आहे की , देशांतर्गत प्रवाशांची वाढलेली संख्या , सणासुदीच्या दिवसांमध्ये देखील सोहळे आदींमुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी जोरदार वाढली आहे .

  त्यामुळे तुम्ही अतिशय सतर्क व सावध राहायला हवे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.