तो चोरी करण्यासाठी आला आणि पकडला गेला मग काय !

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील धनाजेच्या मुंगबारी पाडा येथे रात्री वाजेच्या सुमारास चोरटा घरात शिरल्याचे लक्षात आल्यानंतर घरातील पुरुषांनी त्यास हुडकून काढत चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले . ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला . मुंगबारी पाडा येथील उदसिंग पावरा यांच्या घरात रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटा घरामागील शौचालयावरून पहिल्या मजल्यावर गेला होता . याठिकाणी असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू असताना आवाज झाल्याने घरातील पुरुष मंडळी जागी झाली .

त्यांनी तपास केला असता , घराच्या गच्चीत एक जण दिसून आला . गावात आरडाओरड झाल्याने ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला . सुनील रामदास पावरा , धनाजेचा मुंगबारी पाडा , असे चोरट्याचे नाव असून , त्याच्याविरोधात गुलाबीबाई उदसिंग पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या चोरीचा तपास पोलीस नाईक वसईकर करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.