• Tue. Aug 16th, 2022

    तो पत्नीच्या उपचारासाठी गेला गावी आणि इकडे चोरट्यांनी केला घरात हात साफ.

    जळगाव : शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढत असताना पुन्हा चोरीचे एक प्रकरण समोर आले आहे . झाले असे की मध्य प्रदेशातील एक तरुण पत्नीच्या उपचारासाठी मऊळ गावी गेला असता त्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने लांबवले . ही घटना २ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे . सत्यनारायण मुन्नालाल गौतम वय ३२ , रा . महाबळ यांच्या घरी चोरी झाली आहे . गौतम हे सतना मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी आहेत . ते नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट कंपनीत नोकरीला आहेत . त्यांच्या पत्नीची प्रकृती खराब असल्यामुळे उपचारासाठी ते २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळगावी गेले होते . दरम्यान , चोरट्यांनी घर बंद पाहून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला . हा प्रकार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ .३० वाजता त्यांचे घराचे मालक यांच्या लक्षात आला . त्यांनी गौतम यांना फोन करून घटना कळवली . यानंतर ४ रोजी गौतम जळगावात आले . आता याचा तपास पोलीस करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published.