दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरले, वेळेवरच होणार सगळे पेपर.

शेअर करा.

मुंबई : कोरोनामुळे मागिल दोन वर्षे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . हे नुकसान भविष्यात पुन्हा होऊ नये , यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासपूर्वक परीक्षांचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे . यामुळे ठरलेल्या वेळेतच दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केला .

 

दहावी , बारावीच्या परीक्षा या एक महिना पुढे ढकलण्याच्या मागणीवरती शिक्षण खाते हे विचार करत असल्याचे विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी केले होते . याबाबतीत विद्यार्थ्यांची दिशाभूल होता कामा नये , असे आवाहनही गायकवाड यांनी केले होते . काही बदल झाल्यास त्याची माहिती दिली जाईल .

 

 

सध्या तरी परीक्षांच्या तारखा बदलण्यासंदर्भात विचार अथवा निर्णय झाला नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply