दहावी – बारावी फेरपरीक्षा होणार गुरुवारपासून.

जळगाव : इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच एटीकेटीसाठी विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत . दहावीची परीक्षा २२ सप्टेंबरपासून तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होईल . राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ८ ऑक्टोबर या कालावधित होईल .इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक , श्रेणी , तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होईल. तसेच बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ११ ऑक्टोबर या कालावधीत होईल .

Leave a Reply

Your email address will not be published.