दहा महिन्याच्या मुलीच्या गळ्यात अडकली बामाची डबी काय घडला प्रकार वाचा पूर्ण बातमी.

मुक्ताईनगर : जवळपास १० महिन्याच्या मुलीच्या गळ्यामध्ये अडकलेले बामच्या डबीचे झाकण डॉ . एन . जी . मराठे यांनी अगदी अलगदपणे बाहेर काढून या चिमुकल्या मुलीला जीवनदान दिले आहे . मुलीचा जीव वाचविण्याकरिता भीतीने घाबरलेल्या पालकांना डॉक्टरांमधील देवमाणसाचे दर्शन घडवून आले .

 

सकाळी शनिवार निमखेडी खुर्द येथील रहिवासी निलेश सुरवाडे यांच्या १० महिन्याच्या भूमी नाव असलेले मुलीने झोक्यामधे खेळताना हातामधील बामच्या डबीचे झाकण तोंडात टाकले व हे झाकण चिमुकलीच्या गळ्यामध्ये जाऊन अडकले . यामुळे चिमुकलीचा देखील श्वासही मंदावला आणि अत्यवस्थ स्थितीमध्ये तीला नाक कान घसा आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ . मराठे यांच्याकडे आणण्यात आले . डॉक्टरांनी शर्थीचे कठोर प्रयत्न करीत अत्यवस्थ असलेल्या भूमीच्या गळ्यात अडकलेले झाकण अलगदरित्या बाहेर काढले .

 

आईच्या दुधावर व पातळ आहारावर असलेल्या भूमीच्या नाजुकशा गळयात रूपयाच्या नाण्यापेक्षाही मोठे असणार झाकण अडकले होते . पालकांनी साश्रू अशा नयनांनी डॉक्टरांचे आभार मानले . भेदरलेल्या अवस्थेत रडत येणारी भूमीची आई तिला सुखरूप असल्याचे पाहून आनंदात दवाखान्याबाहेर पडली . या बालिकेच्या अन्ननलिकेपाठोपाठ श्वसननलिका देखील दाबली गेली होती . गुदमरलेल्या अवस्थेत तीला पालक डॉक्टरांकडे घेऊन आले होते . पालकांनी तिला वेळेवर दवाखान्यात हजर केल्याने वेळेवर उपचार करता आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published.