दिलासा: करवंद धरणातून सोडण्यात आले पाणी.

शेअर करा.

शिरपूर : तालुक्यातील करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी भूजल पातळी वाढण्यासाठी तसेच जमिनीत जल पुनर्भरण होण्यासाठी सोडण्यात आले . या पाण्यामुळे भूजल पातळीत वाढ तर होईलच परंतु खरीप पिकांसाठी ते लाभदायी ठरणार आहे . तसेच शिरपूर पॅटर्नच्या अनेक बंधा – यांमध्ये हे पाणी जाऊन ते बंधारे भरण्यास मदत होऊन परिसरातील शेतजमिनी व भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे . गेल्या वर्षी करवंद धरणाच्या परिसरात गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला होता . हा गाळ असंख्य शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात आपल्या ट्रॅक्टर वाहनांनी वाहून नेल्याने जमिनी सुपीक होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली . गाळ काढल्यामुळे करवंद धरण व परिसरात भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत झाली . नदी पात्रात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होते व गाळ साचतच राहतो . त्या कारणामुळे सिंचनही कमी होते . आता धरणाचे पाणी सोडल्याने बरेच शेतकरी समाधानी आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply