दिलासा : जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला.

जळगाव शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे . गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे .जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याचे चित्र ऑगस्ट महिन्यात होते . महिन्याच्या शेवटी दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे . असे असले तरी आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने अतीवृष्टी झालेल्या चाळीसगाव तालुक्यात मदत कार्यात वेग आला आहे .१०० टक्के पाऊसआतापर्यंत केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे . तर धरणातील पाणीसाठयात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी जलसाठा झाला आहे .

यावेळेस पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस शेतकऱ्यांसह सर्वानाच चकवा देत आहे . यंदा दमदार पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता . मात्र तो पहिल्या महिन्यातच फोल ठरला . पंधरा जूननंतर खऱ्या अर्थाने पाउस सुरू झाला . जुलैमध्ये पून्हा पंधरा दिवस पावसाने ओढ दिली . यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकयांवर आले होते . मात्र जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले . परत जुलैच्या शेवटच्या आठवड्या पासून ते १६ ऑगस्ट पर्यंत पावसाने ओढ दिली . पावसाचे वातावरण तयार होत होते . मात्र पाऊस पडत नव्हता . अखेर १७ ऑगस्ट पासून पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला . नंतर ओढ दिली . ऑगस्टच्या शेवटच्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला . पाणी टंचाई मिटण्यासाठी व आगामी सिंचनासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.