दिलासा : मागील अकरा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही !

धुळे : धुळे जिल्हा हळूहळू कोराना मुक्त होण्याचा वाटेवर आहे कारण धुळे जिल्ह्याने पुन्हा एकदा कोरोनावर मात केली आहे . उपचार घेत असलेले तिन्ही रुग्ण मंगळवारी बरे झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . गेल्या १५ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे . २० ऑगस्ट रोजी तीन रुग्ण आढळले होते . यापूर्वी देखील जिल्हा कोरोनामुक्त झाला होता . पण त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळले होते . कोरोनाचा संसर्ग झालेल्या त्या रुग्णांचा इतर शहरात प्रवास झाल्याची माहिती मिळाली होती . त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली असली तरी जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.