दिव्यांग बांधवांना हक्काचे धान्यापासून ठेवले जात आहे वंचित

शेअर करा.

जळगाव : घरामधील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधापत्रिके मध्ये नाव असल्यास संबंधिताच्या पूर्ण कुटुंबाला ३५ किलो धान्य वाटप करण्यात यावे , असा अध्यादेश शासनाने जारी केला आहे . परंतु , जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून सदर अध्यादेशाची पायमल्ली केली जात असून , दिव्यांग बांधवांना हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवले जात आहे . यामुळे दिव्यांग बांधवांना हक्काचे धान्य मिळावे , याकरिता जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारण्यात आलेले आहे .

३५ किलो धान्याबाबत संबंधित विचारपूस दुकानदाराशी केल्यास , तसेच तुमचा कोटा आलेला नाही , सद्यस्थितीत तो शिल्लक नाही , अशी उडवा – उडवीची उत्तरे देऊन दिव्यांग बांधवांची एकप्रकारे हेटाळणी करीत असल्याचा आरोप दिव्यांग सेनेने केलेला आहे . तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवाला ३५ किलो धान्य मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या धान्यासाठी दिव्यांग सेनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारण्यात आले होते. उपोषणात राज्य सचिव भरत जाधव , जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन , जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील , सचिव हितेश तायडे , भीमराव म्हस्के , तोसिफ शहा , मुत्ताजीम खान , सादीक पिंजारी , नितीन सूर्यवंशी , ज्ञानेश्वर पाटील आदींचा यामध्ये समावेश आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply