दुकानांवर आता फक्त लागणार मराठीच्या पाट्या

शेअर करा.

मुंबई : दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची अज्ञाप पर्यंत सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून पुन्हा वापरता येणार नाही . राज्यांमधील सर्व दुकानांच्या पाठ्या आता सरसकट मराठी भाषेत असायला हव्यात , अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात करणार असून , या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी प्राप्त करून दिली आहे .

राज्यातील सर्व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावे , असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला असून , यासंदर्भात महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम , २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे .

मराठी – देवनागरी लिपीतील अक्षरेही इंग्रजी किंवा अन्य भाषेपेक्षा छोट्या स्वरूपात असणार नाहीत . यासोबतच मराठी अक्षरांच्या उंचीबाबत देखील सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . दुकाने , आस्थापनांना मराठीसोबतच इतर भाषेत म्हणजे इंग्रजी किंवा इतर भाषेत पाटी लावता येणार असली तरीदेखील , मराठी भाषेतील पाटी आधी असायलाच हवी .

ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असतील , अशा आस्थापनेस महापुरुष / महनीय महिला यांची किंवा गड – किल्ल्यांची नावे देऊ नये , असाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply