दुचाकी कट मारल्याचा कारणावरून दोन गटात हाणामारी.

शेअर करा.

जळगाव : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन भुसावळ रोडवरील पन्नालाल वखारजवळ तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली . मारहाणीत दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले आहेत .याबाबत माहिती अशी की , तांबापुरा परिसरातील अजमेरी गल्लीतील रहिवासी फरिद महंमद मुलतानी ( वय २० ) हा गुरुवारी त्याचा मित्र राहुल सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने फटाके घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते . रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील फटाके घेऊन पाचोरा रोडने तांबापुऱ्याकडे जात असतांना पाचोरा रोडने जळगावकडे येणाऱ्या मालवाहु वाहनाने दुचाकीला कट मारला .

मालवाहू वाहनांवरील चालकास कट का मारला त्याचा जाब विचारत तो निघून गेला . त्यानंतर मुलतानी व त्याचा मित्र सोनवणे याने त्याचा पाठलाग करून भुसावळ रोडवर पन्नालाल वखारजवळ वाहन थांबवले . दुचाकीला कट का मारला त्याचा जाब विचारत असतांना घटनास्थळी दाऊद शहा हा आला . त्याने चारचाकीचालक माझा मित्र असून तुम्ही येथून निघून जा असे सांगत मुलतानी व सोनवणे यांना शिवीगाळ केली . राहुल सोनवणे तत्काळ पूर्ण करून मोहनसिंग बावरी वत्याच्या इतर मित्रांना घटनास्थळी बोलावले . तर दाऊद शहा यानेसुद्धा फोनवर सात ते आठ जणांना घटनास्थळी बोलावले . याठिकाणी तरुणांच्या दोन्ही गटात हाणामारी झाली . मालवाहु वाहनावरील चालकाच्या बाजूने असलेल्या सात ते आठ जणांनी मुलतानी व त्याच्या मित्रांवर दगडफेक केली तर यात दाऊद शहा याने राहुल सोनवणे याच्या छातीवर लोखंडी रॉडने मारहाण केली . हाणामारीत राहुलसह फरीद मुलतानी , मोहनसिंग बावरी आणि अनिस हमीद पटेल व अनिल रमेश चौधरी या चौघांना दुखापत होवुन ते जखमी झाले आहेत . याप्रकरणी फरीद मुलतानी याने दिलेल्या फिर्यादीवरून दाऊद शहा , अरबाज शहा , रफत शेख , इकबाल शेख , इकबाल जुनेद , भाई शेख , साहिल शहा , रेहान शेख सर्व रा . तांबापुरा या आठ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply