दुर्देवी : तापीच्या पात्रात मोठ्या भावाला वाचविताना लहान भाऊ गेला वाहून ; परिसर शोकाकुल.

शेअर करा.

प्रकाशा येथील तापी घाटावर अंघोळ करीत असताना पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेला लहान भाऊ पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना प्रकाशा येथे घडली .

* उत्तर कार्याच्या विधीसाठी गेले होते घाटावर :

दोन्ही भाऊ है मृत आजोबांच्या धार्मिक विधीसाठी

घाटावर गेले होते . राज सामुद्रे (वय १७ ) रा . प्रकाशा असे मृत युवकाचे नाव आहे तर गौतम सामुद्रे (वय १२ ) याला तेथील मच्छिमारांनी वाचविले . सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास केदारेवर मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीच्या जवळ तापी घाटावर नातेवाईकांसह दोन्ही भाऊ आजोबांच्या उत्तर कार्याच्या विधीसाठी गेले होते .

 * गौतम याचा घसरल्याने तो पाण्यात पडला मग राजनेवाचवन्याचा प्रयत्न केला पण…

मुंडण केल्यानंतर राज गौतम है नापी पात्रात अंघोळीसाठी गेले होते . यावेळी गौतम याचा घसरल्याने तो पाण्यात पडला . त्यावेळी राज हा त्याला वाचविण्यासाठी पुढे सरकला असता त्याचाही पाय घसरून पाण्याच्या वेगवान प्रवाहात तो वाहून मेला यावेळी गौतमला वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले त्याला तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले .

* तापीच्या अमोघ पात्रात राज सापडला नाही :

तापीच्या आलेल्या पुरामुळे नदीचे पात्र हे प्रचंड वेगाने वाहत आहे त्यामुळे तापीच्या अधोग पाण्यात मात्र राज सापडला नाही . गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले . पात्रात राज याचा शोध घेतला असता तो सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आला नव्हता . राज ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता . अचानक झालेल्या या घटनेमुळे संपुर्ण परीसरात शोककळा पसरली आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply