दोन दिवसात एक लाख कोटीचा झाला सौदा, राकेश झुनझुनवाला यांची विमान वाहतूक क्षेत्रात दहशत.

शेअर करा.

राकेश झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये दहशत निर्माण करण्याकरिता जोरदार अशी तयारी केली आहे . 72 बोईंग 737 MAX विमान खरेदी केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी स्पेशल इंजिन करीत 4.5 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आलेला आहे . राकेश झुनझुनवाला – समर्थित एअरलाइन Akasa Air यांनी त्यांच्या Boeing 737 MAX विमानासाठी नवे आणि अधिक शक्तिशाली असे CFM LEAP – 1B इंजिन खरेदी करत असल्याचा करार जाहीर केला आहे .

तज्ञांच्या मते , हा करार जवळपास 4.5 अब्ज डॉलर्सचा असल्याचे मानले जाते . बोईंगकडून ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमान खरेदी करत असल्याच्या घोषणेच्या एका दिवसानंतर कंपनीच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे . या खरेदी व सेवा करारामुळे , Akasa Air चे ऑपरेशनच्या प्रथम दिवसापासून CFM द्वारे एक नाविन्यपूर्ण तसेच सर्वसमावेशक देखभाल कार्यक्रम असतील , असे कंपनीने एका निवेदनामध्ये सांगितले आहे . दुबईत सुरू असणाऱ्या एअर शोदरम्यान सीएफएमसोबत करार करण्यात आला आहे .

करारामध्ये अतिरिक्त इंजिन तसेच दीर्घ सेवा आयुष्य याचा समावेश आहे आणि अंदाजे $ 4.5 अब्ज किमतीचे आहे . भारतीय चलनात ताज्या कराराचे मूल्य 33,000 कोटी रुपये इतके आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply