धक्कादायक : खदानीत पडल्याने शेतमजुरासह झाला बैलाचा मृत्यू ! संपुर्ण परिसरात हळहळ.

शेअर करा.

जळगांव : अंतुली खुर्द येथील प्रौढ प्रकाश बळीराम वाघ( वय ४२ ) हे गुरे चारण्यासाठी गेले असता खदानीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली . या घटनेत त्या युवक सोबत बैलाचा ही मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

* पाझर तलावाजवळील सरकारी खदानीलगत गेले होते गुरे चरायला :

 अंतुर्ली खुर्द येथील रहिवासी प्रकाश वाघ हे शेत मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पालवत होते . गेल्या चार दिवसापासून ते गावातीलच प्रभाकर पोपट पाटील यांच्या शेतात मजुरी करत होते . दरम्यान , १५ रोजी सकाळी गावानजीक असलेल्या पाझर तलावाजवळील सरकारी खदानीलगत ते गुरे चारण्यासाठी गेले होते . या वेळी अचानक प्रकाश वाघ व प्रभाकर पाटील यांच्या मालकीचा बैल पाण्यात पडला . यात प्रकाश वाय यांच्यासह बैलाचा ही मृत्यू झाला .

 

* प्रकाश वाघ यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल , पण त्यांना अधिकाऱ्यांनी केले मृत घोषीत :

ही घटना शेजारी शेळ्या व गुरे चारणाऱ्या योगेश भारत पाटील यांच्या लक्षात आली . त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना घटनेबाबत माहिती दिली . ग्रामस्थांनी घटनास्पळी धाव घेऊन प्रकाश बाप व बैलाला पाण्यातून बाहेर काढले . तर प्रकाश वाघ यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . वैद्यकीय अधिकारी डॉ . अमित साळुखे पांनी त्यांना मृत घोषित करुन शवविच्छेदन केले .

* अकस्मात मृत्यूची करण्यात आली नोंद :

या प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . मृत प्रकाश वाघ यांच्या पश्चात पत्नी , २ मुले . २ मुली , भाऊ असा परिवार आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply