यावल शहरातील समर्थ नगरात राहणाऱ्या ३६ वर्षीय मुख्यध्यापकाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे .
* जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक म्हणून होते कार्यरत :
विशाल बाबुराव गवळी ( वय ३६ ) असे मृत शिक्षकाचे नाव असून याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे . शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील राहणारे विशाल गवळी हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक म्हणून कार्यरत होते .
* मध्यरात्रीच्या सुमारास छताला दोरी बांधून गळफास , पत्नीला बसला मोठा धक्का :
काल रात्री पत्नी आई – वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले , मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले . तेव्हा पतीचा मृतदेह पाहिल्यामुळे पत्नीला जबर धक्का बसला होता.
* पोलीसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद:
याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .तरी याचा पोलीस सविस्तर तपास करीत आहे.