धक्कादायक : सात वर्षाच्या चिमुकलीवर अल्पवयीन मुलाने केला अत्याचार ; शनिपेठला गुन्हा दाखल.

जळगाव मधील एका भागात सात वर्षीय शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर १३ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना २ ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे . याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

शनिपेठ पोलिस ठाण्यात हद्दीत मुलगी आई – वडील आणि भावासोबत राहते . त्यांच्या घराच्या समोर आत्याचे घर आहे . आत्याकडे खेळायला गेली असताना त्या दिवशी रविवारी दुपारी घराच्या छतावर नेवून तिच्यावर अत्याचार केला . हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पीडित मुलीचे वडील दुपारच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला . वडीलांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन घडलेला प्रकार ऐकला . त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला . याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी रविवारी रात्री शनीपेठ पोलिसात तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.