धुळे : धुळे ते चोपडा राज्य मार्ग १५ वर असलेल्या मंगरूळ गावाजवळील पाटील माध्यमिक शाळेजवळ दुभाजकाला रिफ्लेकटर , विद्युत दिवे नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात दुभाजक दिसत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात . दरम्यान , ४ रोजी रात्री व ५ रोजी पहाटे दोन चारचाकी दुभाजकाला आदळून अपघात झाला . या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर याच अपघातातील जखमी व्यक्तीच्या वडिलांनी मुलाविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पहिल्या अपघातात जळगाव येथील दिनेश सोनार हा मित्रांसोबत घेवून चारचाकी ने मुंबईला फिरायला गेला होता . ५ रोजी पहाटे ३ वाजता मंगरुळ गावाजवळ या चारचीकीने दुभाजकाला जबर धडक दिली . या अपघातात दिनेश सोनार त्याचा मित्र कांतीलाल कावडे व दिनेश पाथरीया हे जखमी झाले आहेत . या प्रकरणी जळगाव येथील विठ्ठल नथ्थू सोनार यांच्या फिर्यादीवरुन चारचाकी चालक दिनेश सोनार याच्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . त्यामुळे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे
Home » धुळे ते चोपडा राज्य मार्ग १५ बनला धोकादायक: मंगरुळजवळ दुभाजकावर कार आदळली , तीन जखमी ,जळगावच्या पित्याने मुलाविरुद्ध दाखल केला गुन्हा.