नदीत फेकले ,पाच वर्षाच्या मुलाला पित्याचे क्रूर कृत्य ।

शेअर करा.

कोल्हापूर : मुलाचा औषधउपचार यांवरील खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून कबनूर ( ता . हातकणंगले ) या ठिकाणी एका पित्याने पोटच्या पाचवर्षीय असणाऱ्या मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिले . या धक्कादायक प्रकाराची पित्याने पोलिसांसमोर फेकल्याचे कबुली दिल्याने वाच्यात झाली . अफान सिकंदर मुल्ला हे त्या मुलाचे नाव असून . या प्रकरणाबाबत पिता सिकंदर हुसेन मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे . मुलाचा शोध घेण्याचे कार्यदेखील सुरूच आहे .

मागील दोन महिन्यांतील इचलकरंजी येथे ही तिसरी घटना आहे . सिकंदर मुल्ला हा मुळतः दिव्यांग असून , ज्या ठिकाणी काम मिळेल त्या ठिकाणी मजुरीचे काम करतो . त्याला दारूचे व्यसन जडलेले होते . सिकंदर याला दहा वर्षांची मुलगी आणि अफान अशी दोन अपत्ये आहेत . अफान याला फिट्सचा आजार जडलेला असल्याने औषधोपचारांना लागणारा खर्च त्याला पेलवत नव्हता .या कारणावरूनही त्यांच्या घरामध्ये नेहमी वाद होत असायचे. गुरुवारच्या सायंकाळी तो सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर निघाला . रात्री घरी परतल्यानंतर त्याने अफानला पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे कळवल्या .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply