नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय सुधारित कृषीकायदे घेणार मागे वाचा सविस्तर बातमी.

दिल्ली – मागील काही महिन्यांपासून सुधारित अशा कृषी कायद्याच्या विरोधात देशभरामध्ये विरोध सुरु होता , सुधारित कृषी कायदे मागे घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आक्रमक असे आंदोलन केले , शेवटी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे . आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ ते ’ तीनही सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली .

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित कृषी कायदे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा केलेली असली तरी येत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे कायदे मागे घेण्याकरिता कार्यवाही केली जाणार असल्याचे कळाले आहे . गुरूनानक जयंतीनिमित्त संपूर्ण देशाला संबोधित करत असताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.