नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेच्या त्रुटीसंदर्भामध्ये राज्य तसेच केंद्र सरकारने चालविलेली चौकशी थांबवावी , हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला . तसेच या घटनेशी संबंधित राज्य सरकार , पोलीस , केंद्रीय यंत्रणांकडील सर्व कागदपत्रे ताब्यामध्ये घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना सांगितले आहेत .
सरन्यायाधीश एन . व्ही . रमण यांच्या खंडपीठाने सांगितले की , पंजाबमध्ये सुरक्षा यंत्रणेमध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत राज्य व केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी चालविलेली चौकशी थांबवाव्या . मोदी यांच्या सुरक्षेतील सर्वोच्च दाखल निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे . तिची पुढील सुनावणी येत्या सोमवारी , १० जानेवारीला होईल त्यावेळी या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सविस्तर युक्तिवाद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेशी संबंधित सर्व कागदपत्रे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना तात्काळ उपलब्ध करून देण्याकरिता पंजाब सरकार , पोलीस तसेच केंद्रीय यंत्रणांनी सहकार्य करावे , असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे .