नांदेड : मुंबई एनसीबीने नांदेड – हैदराबाद मार्गावरती गुप्त माहितीच्या आधारावर मंजराम ( तालुका नायगाव ) या ठिकाणी जवळपास ११२७ किलोग्रॅम इतका गांजा जप्त केला होता . या प्रकरणाबद्दल गांजा तस्करी प्रकरणामधील संशयित आरोपींना आज बिलोलीया याठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली कळाले आहे .
नोव्हेंबर 15 ला नायगाव तालुक्यामधील मांजरम येथे मुंबई एनसीबीने एका ट्रकमधून ११ क्विंटल २७ किलो गांजा जप्त केला असून ट्रक चालक गोपू राजपूत ( गोणबाची , पैठण )आणि सुनिल महाजन ( जळगाव ) या दोघ संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली होती . त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसाकरीताची पोलिस कोठडी सुनावली होती . आज कोठळी मधील मुदत संपली असल्याने संशयित आरोपींना बिलोली या ठिकाणच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले . न्यायालयाने दोघांना १४ दिवसाकरीताची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . यासंबंधी माहिती एस . बी . कुंडलीकर ( सरकारी वकील , बिलोली ) यांनी समोर आणली आहे .
यादरम्यान एनसीबीला या दोघ संशयित आरोपींकडून ठोस अशी माहिती मिळालेली नाही . परंतु गांजा तस्करीची मोडसअप्रेंडी एनसीबीला कळालेली आहे . एनसीबी यापुढे काय कारवाई करते रवी याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे