नागाचा विळख्यात होती लहान मुलगी वाचा संपूर्ण घटना.

वर्धा : एक ६ वर्षांच्या मुलगी झोपेत असताना रात्रभर एका विषारी नागाने विळखा घातला . नागाचा विळख्यात होती लहान मुलगी वाचा संपूर्ण घटनाहालचाल केल्यावर तो चावेल या भीतीने मन घट्ट करून ती गुपचूप पडून राहिली . तब्बल दोन तास तिने शौर्य दाखविले ; परंतु शेवटी त्याने हल्ला केलाच . तिला दंश करून नाग नाहीसा झाला . या मुलीवर आता रुग्णालयात उपचार सुरू असून अंगाला थरकाप आणणारी ही थरारक घटना वर्धा तालुक्यातील बोरखेडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली, पूर्वा पद्माकर गडकरी ही नावाची सहा वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत शुक्रवारी रात्री जमिनीवर अंथरूण टाकून झोपली असताना . रात्रीच्या पहारात एक विषारी नाग मायलेकींच्या अंगावर आला , यात मुलीच्या आईला अचानक जाग आल्यामुळे ती हळूच बाजूला झाली . नागाने मुलीच्या गळ्याला विळखा घातला असून फणा काढलेला होता . हे दृश्य पाहून अनेकांच्या झोपा उडाल्या ; पण मुलीला शौर्य देत शांत राहण्यास सांगितले .

 

जवळपास दोन तासांनंतर नागाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला . पण त्याच्या शेपटाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दाबला गेला असल्याने त्याला स्वतःची सुटका होत नव्हती त्याच वेळी नागाने मुलीच्या हाताला दंश घेतला आणि गायब झाला गावक – यांनी मुलीला लगेच सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात भरती केले . सध्या ही मुलगी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.