ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले ; शेतकयांना मोठा दिलासा …

या वेळेस कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत अशा परिस्थितीत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सरपंचांसह शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी आदेश दिल्यानंतर गिरणा नदीच्या पात्रातून पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधाऱ्यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे .

यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे नागरिकांनी ना . गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत . याबाबत वृत्त असे की , गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात चांगला पाणीसाठा होता . यंदा ऑगस्ट महिना संपण्यात आला असला तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के इतका जलसाठा आहे . दरम्यान , धरणाच्या खालील भागातील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते . यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांना लागून असणाऱ्या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते .

त्यामुळे ना. गुलाबराव पाटील सद्याची परिस्थीतिची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र कुमार बेहरे यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले . या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव या बंधायांमधून कालव्यांमध्ये काल पाणी सोडण्यात आले आहे .

यातील जामदा बंधाऱ्यातील पाण्यामुळे बहाळ , कोळगाव , भडगाव व आमडदेसह परिसराला लाभ होणार आहे . तर दहीगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव , एरंडोल , धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे . यात प्रामुख्याने दापोरा , खेडी , रिंगणगाव , कढोली , वैजनाथ , टाकरखेडा , पाळधी , पथराड , फुलपाट , झुरखेडा , दोनगाव , चांदसर , पिंपळगाव , वराड , हिंगोणा आणि पिंप्रीसह अमळनेर तालुक्यातील पातोंडा , जळोद , कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे . यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे . पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी तातडीने दखल घेऊन कालव्यांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत . या निर्देशामुळे शेतकरीराजा आनंदी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.