निकाल जाहीर केला नकली वेबसाईटवरून आणि लुटले पैसे

पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आरोपी आणि परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांनी जी . ए . सॉफ्टवेअरचा येथील संचालक डॉ . प्रीतिश देशमुख यांच्याशी पार्टनरशिप केली . त्यांनी बनावट स्वरूपाची वेबसाईट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर करत पैसे उकळले गेले, अशी माहिती न्यायालयामध्ये देण्यात आली .

न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी ३० डिसेंबरपर्यंत वाढवली असल्याचे कळाले आहे . चौकशीत सावरीकर उडवाउडवीची उत्तरे सांगत आहेत . सुपे याने त्याच्या नातेवाईक आणि परिचितांकडे काही रक्कम दिल्याचे निष्पन्न झाले आहे . सुपे याच्या कार्यालयातील इतर कोणी साथीदारांनी आरोपीला मदत केली असेल का , याबाबत तपास केला जात आहे .

या गुन्ह्याची तयारी ही पूर्णपणे पूर्वनियोजित होती . यामध्ये राज्यातील एजंट , अकादमीचालक यांनी मदत केली का , याचीही तपासणी केली जाणार आहे , असे पोलिसांनी कळवले आहे आणि आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलानी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.