जळगाव : काही दिवसापूर्वी पाल येथे शिरवेलचा महादेवचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मित्रांचा दुर्देवी अपघात झाला होता अशीच दुर्देवी मन हेलवणारी घटना पुन्हा समोर आली आहे . झाले असे की वाढदिवस साजरा करण्यासाठी पाल येथे गेलेल्या तरुणासह त्याचा मित्र पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाल येथे घडली , अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील ( वय २४ , रा . खेडी ) व त्याचा मित्र जयेश माळी असे दोघे जण पाण्यात बुडाले आहेत . उज्ज्वल याचा रविवारी वाढदिवस होता . त्या निमित्ताने वाघनगरातील १० ते १६ तरुण हे पाल येथे पर्यटनासाठी गेले होते . दरम्यान , हे तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेले असता उज्ज्वल व वाघनगरातील जयेश माळी हे तरुण पाण्यात बुडाले . या घटनेमुळे सोबत असलेल्या मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला , रात्री उशिरापर्यंत दोघे मित्र मिळून आलेले नव्हते . घटनेची माहिती मिळाल्यानंतर उज्ज्वलच्या नातेवाइकांनी पाल येथे धाव घेतली .त्यामूळे त्यांचा शोध घेणे अद्याप सुरू आहे
* मौजमस्तीचे शेवटचे १० मिनिटे त्यांना पडले महागात
त्या दिवशी सगळ्या मित्रांनी सोबत पाण्यात मौजमस्ती केली नंतर पाण्यात खेळून झाल्यावर ते घरी जाण्यास निघाले परंतू तेव्हा उज्वल आणि त्यांच्या ३ मित्रांना पाण्यात खेळण्याचा मोह परत सुटला आणि ते पुन्हा पाण्यात गेल्यावर अचानक त्यांचा पाण्याच्या गाढ मध्ये पाय फसल्याने ते आत खेचले गेले तसेच त्यावेळी पाण्याने जोर धरल्यामुळे त्यांचा पोहण्यावर्ती ताबा सुटला आणि ते वाहू लागले . मित्रांना हे लक्षात आल्यावर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यापैकी २ मित्रांना वाचवण्यात त्यांना यश आले .पण उज्वल आणि त्याचा मित्र जयेश पाण्याच्या वाढत्या प्रवाहा सोबत वाहून गेले .
* मित्र म्हणाले आम्ही तुम्हाला १ लाख जागेवर देतो पण आमच्या मित्राला वाचवा
उज्वल आणि त्याचा मित्र पाण्यात बुडत असताना त्याच्या मित्रांनी गावकऱ्यांची मदत घेण्यासाठी गावात गेले . आणि त्यांना म्हणाले की आम्ही तुम्हाला १ लाख आणि आमच्या गाड्या देतो पण आमच्या मित्राला वाचण्यासाठी मदत करा परंतु गावकऱ्यांनी सफशेल नकार दिला कारण पाण्याचा प्रवाह हा त्या दिवशी प्रचंड होता त्यामुळे कोणीही पाण्यात उतरण्यास तयार नव्हते.