निलंबित करण्याचा आदेश आला , सोबत घेऊन आला बसचालकासाठी ‘Heart Attack ‘

चोपडा Khandeshtimes News

चोपडा : चोपडा आगाराचे चालक असलेले बी . एम . कोळी यांना व इतर ९ जणांना सोमवारी चोपड्याच्या आगारप्रमुखांनी निलंबित केल्याचे कळाले आहे . यावेळी कोळी यांना निलंबनामुळे अश्रू अनावर झाले व यातच त्यांच्या छातीत जोरात अशी कळ आली . ही घटना २ ९ रोजी आगाराच्या कार्यालयामध्ये घडली असून यावेळेस निलंबनाचा आदेश देणाऱ्या लिपिकाने तेथून पळ काढला . तर एस . टी . प्रशासनाने साधी रुग्णवाहिका व त्याचबरोबर गाडीची देखील व्यवस्था केली नाही .

यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना स्वतः उचलून ग्रामीण रुग्णालयाकडे पळ काढली . पुढे जाऊन रिक्षा मिळाली , तेव्हा त्यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा या ठिकाणी दाखल केले . उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कळाले आहे . परंतु , निलंबनाचा प्रकार आणि त्याच बरोबर चालकाला झालेला त्रास याबद्दल एसटी संघटना पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या दिसत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.