निवडणुका डोक्यावर पण उमेदवारांचा पत्ता नाही काय आहे प्रकार वाचा सविस्तर बातमी.

Khandeshtimes news अमळनेर : तालुक्यामधील १३ पैकी पाच ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याचे कळाले आहे . इतर सात ग्रामपंचायतींच्या ७ जागा बिनविरोध झालेल्या आहेत . दोन जागांसाठी प्रत्येकी २ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत . लोण सिम , लोण चारम , मुं येथे अनुसूचित जमातीच्या प्रत्येकी एका जागेवर एक देखील अर्ज दाखल झालेला नाही . जात प्रमाणपत्र वैधतेची अडचणी उद्भवत असल्याने वारंवार निवडणूक जाहीर होऊनही कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाही .

 

आरक्षित अश्या जागांवर उमेदवार मिळत नाहीत , सर्वसाधारण जागेवरती अर्ज दाखल होत नाही याचा अर्थ असा की नागरिकांत उदासीनता असून , जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होत नसल्यानेही निरुत्साह आढळून येत आहे .

 

नगाव खुर्द येथे सर्वसाधारण स्त्री जागेवरदेखील एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे कळालेले आहे . एक वर्षाकरीता निवडणूक लढविण्याच्याबाबत उदासीनता होती . सर्वसाधारण जागा असून देखील अर्ज दाखल न होणे म्हणजे लोकशाहीची थट्टाच होते ,असे बोलले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.