• Tue. Aug 16th, 2022

  निसर्गाचा प्रकोप : चाळीसगाव तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान.

  जळगाव जिल्ह्यात सोमवार ( ता . ३० ) पासून मुसळधार पाऊस असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ४२ गावांतील ४३ हजार ३८५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे मंगळवारी ( ता . ३१ ) सादर केला . एकूण १५ हजार ९ १५ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले .

  पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाचाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांत जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार गिरीश महाजन आदींनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकयांशी संवाद साधला .

  झालेले नुकसान असे कोरडवाहू ज्वारी : १४३ हेक्टर बाजरी २५० हेक्टर बागायती कापूस : १२ हजार २१५ मका : ३ हजार ५० इतर पिके : १०० फळपिके : १५० एकूण १५ हजार ९ १५ हेक्टर.

  Leave a Reply

  Your email address will not be published.