• Tue. Aug 16th, 2022

  न्यायालयात झाला अंदाधुंद गोळीबार बदमाशाने घेतला होता वेश वकिलाचा.

  ByKhandeshTimes

  Sep 25, 2021

  नवी दिल्ली : या ठिकाणी रोहिणी भागातील न्यायालयात दोन बदमाशांनी अंदाधुंद असा गोळीबार करून कुख्यात गुंड जितेंद्र मान म्हणून ओळखला जाणाऱ्या गोगीची न्यायाधीशांच्या समोर हत्या केली . वकिलाचे कपडे परिधान केलेल्या या बदमाशांनी गोळ्या झाडल्या . याच्या उत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या दोघांचा देखील खात्मा झालेला आहे . एखाद्या भयावह चित्रपटाची कहानी असावे या प्रकारची ही घटना शुक्रवारच्या दुपारी रोहिणी न्यायालयात घडली . गोळीबार सुरू होतात न्यायालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.सगळे लोक भीतीमुळे इकडे तिकडे घावू लागला .भीतीने पळू लागले .

   

  जितेंद्र मान ऊर्फ गोगी याला कोर्टरूममध्ये सुनावणीच्या बेताने आणण्यात आलेले होते . एका वकिलाने सांगितल्याप्रमाणे , न्यायाधीशांच्या समोरच असून बदमाशांनी गोगीवर गोळीबार केला . त्याला उलट उत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला . त्यात दोन्ही हल्लेखोरांचा जागच्याजागी मृत्यू झाला . पोलिसांनी हे तिघं मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत , या प्रकरणाचा तपास अजून देखील सुरू आहे आहे . एका महिला वकिलाच्या पायाला या गोळीबारात मध्ये गोळी लागली असून . वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत तपास करीत आहेत . रोहिणी भागातील सरकारी इमारती व न्यायालयातील सुरक्षा मध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.