• Tue. Aug 16th, 2022

  पतंग उडवण्याच्या नादात नऊ वर्षे बालकाचा मृत्यू.

  ByKhandeshTimes

  Dec 19, 2021

  भडगाव: विजेच्या तारेला अडकेलला पतंग काढण्याकरिता जोरदार शॉक लागून नऊ वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने मृत्यू झालेला आहे. यात तो गंभीर स्वरूपात जखमी झाला . मागील पाच दिवसापासून सुरु असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर गुरुवारी संपली . दर्शन प्रशांत पाटील असे या दुदैर्वी मृत्युमुखी पडणाऱ्या बालकाचे नाव आहे . तो इयत्ता तिसरीत शिकत आहे . त्याचे आई वडील हे पुण्याला राहतात . पुण्यामध्ये त्यांचे कापड दुकान आहे .

  लग्नासाठी काही दिवसाआधीच तो कजगाव ता . भडगाव येथील आजोबा ( आईचे वडिल ) ब्रिजलाल • दामू पाटील यांच्याकडे आलेला होता . ११ रोजी दुपारी तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर त्याच्या मित्रांसोबत पतंग उडवित होता . त्याचवेळी एक पतंग हे विजेच्या तारात अडकले . ही पतंग काढत असताना त्याला जोरदार असा शॉक लागला आणि दर्शनचा तोल गेला आणि काही कळेल त्याआधीच तो दुसऱ्या मजल्याच्या टेरेसवरून तो खाली कोसळला . जखमी झाल्याने त्याला तात्काळ चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले . गेल्या पाच दिवसापासून त्याची मृत्यूशी लगातार झुंज सुरु होती . गुरुवारच्या दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला . त्याच्यावर कावपिंप्री या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आलेला होता . त्यावेळी गावकऱ्यांनाही अश्रू आवरणे अत्यंत कठीण झाले होते .

  Leave a Reply

  Your email address will not be published.