• Tue. Aug 16th, 2022

  पतीने केला पत्नीचा ३० वेळा वार करून खून, काय घडला प्रकार जाणून घ्या संपूर्ण बातमी.

  ByKhandeshTimes

  Nov 21, 2021

  चंदिगढ : हरियाणामधील संपत येथे राहत असणारे पती – पत्नीयांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वादा-वाद होत होते याच चरित्र संशयातून पतीने पत्नीवर ३० वार करून पत्नीचा खून केल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिल्या गेलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

  हरियाणामधील सोनीपत शहरात तारानगर याठिकाणी पती शत्रुघ्न आणि पत्नी पूनम राहत होते . पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता . पत्नीचे बाहेर अनैतिक असे संबंध असल्याचं त्याला वाटत होतं , याकारणावरून त्यांच्यात वारंवार वाद देखील घडत असे . घटनेच्या दिवशीही याच कारणावरून, संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले . यानंतर पूनमच्या अंगावर धारदार अशा चाकूने तब्बल 30 वेळा वार केले . यामुळे पूनमचा जागच्याजागी मृत्यू झाला . घटनेची माहिती प्राप्त होताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे , मृत पत्नी पूनमचे वडील भगवान दास यांच्या जबाबावरून पोलिसांनी शत्रुघ्नविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंदणी केली आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.