पश्चिम रेल्वे मुंबई या ठिकाणी 80 जागांची भरती, सुरू वाचा सविस्तर माहिती.

पश्चिम रेल्वे मुंबई या ठिकाणी 80 जागांच्या भरती होणार आहेत . याकरिता उमेदवारांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे . या पदांकरिता पात्र उमेदवारांनी यासाठी दिल्या गेलेल्या लिंकवर ऑनलाइन रित्या अर्ज करायचे आहेत . अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे . GDCE कोट्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे .

 

या पदांसाठी होणार भरती

 

१ ) कनिष्ठ स्टेनोग्राफर

२ ) कनिष्ठ अनुवादक / हिंदी

३ ) कनिष्ठ अभियंता

४ ) तंत्रज्ञ ( Technician )

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव

 

कनिष्ठ स्टेनोग्राफर :

उमेदवाराचं दहावी त्याच्याबरोबर बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित स्टेनोग्राफर म्हणून संपूर्ण शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे . उमेदवारांना त्यासंबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे .

 

कनिष्ठ अनुवादक / हिंदी –

उमेदवारांनी मान्यताप्राप्त अशा संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित अशा पदाशी निगडित शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित पदाबद्दलचा अनुभव असणं आवश्यक आहे .

 

कनिष्ठ अभियंता –

उमेदवारांनी संपूर्ण 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. याबरोबर संबंधित पदाच्या निगडीत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे व उमेदवारांना संबंधित पदाचा एक्सपिरीयन्स असणं आवश्यक आहे .

 

तंत्रज्ञ-

उमेदवाराचं दहावी किंवा ITI पर्यंतचे शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे . तसंच संबंधित पदाच्या संबंधित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे व त्याच बरोबर उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे .

 

याप्रकारे होणार निवड-

या पदाकरिता उमेदवारांची निवड ही प्रथम 10 कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊन केली जाणार आहे . याच्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टेक्निकल व स्किल टेस्ट घेतली जाणार आहे . यानंतर सर्व कागदपत्रांची जाच-पडताळणी करून मेडिकल टेस्ट केली जाणार आहे . अशा रीतीने उमेदवार निवडण्यात येणार आहेत .

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर – 2021 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.